मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवलीचा समाज भूषण पुरस्कार क्रीडा क्षेत्रात उतुंग कामगिरी करुन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही यथाशक्ती मदत करीत खेळ प्रचारासाठी ग्रामीण क्षेत्रातील शाळांमधून खेळसंस्कृती प्रचाराचे उद्दीष्ट समोर ठेऊन आजही कार्यरत असलेले डॉ. अशोक दाभोलकर मेस्त्री (दाभोली, वेंगुर्ला) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान समारंभ २२ मार्च २०२६ रोजी स्व. आनंदजी दिघे सभागृह, गांधीनगर, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ३:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली यांचे ३१ वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि ‘सुतार समाज भूषण पुरस्कार प्रदान समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली अध्यक्ष श्री. बाळकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.गेली पाच दशके क्रीडा व सामाजिक क्षेत्रात योगदान देत असलेल्या मूळ वेंगुर्ले ( दाभोली) श्री.अशोक दाभोलकर – मेस्त्री यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबईतील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.













