मालवण समुद्रातील घटना
मालवण | प्रतिनिधी : समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील रुपेश गोपाळ जुवाटकर (रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) हा खलाशी नौकेतून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मालवण समुद्रात घडली.
याबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. ऑलविन फर्नांडिस यांच्या मालकीच्या मदर मेरी या बल्याव नौकेतून चार जण रविवारी मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करून मंगळवारी सकाळी ही नौका मालवण बंदराकडे परतत असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नौकेतील खलाशी रुपेश जुवाटकर हा नौकेत उभा राहून ब्रश ने दात घासत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो समुद्राच्या पाण्यात पडला. इतर खलाशांनी शोधाशोध करूनही तो समुद्रात दिसून आला नाही. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून अधिक तपास व शोध सुरु आहे.












