पेंडर ग्रा.प. द्वितीय, व अणसूर ग्रा.प.तृतीय
वेंगुर्ले : दाजी नाईक
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सन २०२५-२६ पासून आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणे कार्यक्रम जाहीर केला आहे. या अंतर्गत महिला व बालक यांच्या आर्थिक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वागीण विकास करण्यासाठी सदरचे अभियान राज्यसतर, विभागस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर राबविणेबाबत शासनस्तरावरून कळविण्यात आलेले होते. त्या नुसार सदर अभियानाच्या अनुषंगाने वेंगुर्ले तालुकास्तरीय कमिटी तयार करण्यात आली होती. ग्रामस्तरावर ग्रामपंचायत कार्यालयामार्फत केलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने सादर केलेल्या ऑनलाईन प्रस्तावापैकी गुणानुक्रमे ०९ प्रस्तावाचे मुल्यमापन या समितीकडून करण्यात आले. ज्या ग्रामपंचायतीना जादा गुण मिळाले तालुक्यातील अशा तीन ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. त्यामध्ये गुणानुक्रमे ग्रामपंचायत केळूस प्रथम, ग्रामपंचायत पेंडर द्वितीय, व ग्रामपंचायत अणसूर तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले. या विजेत्या तिन्ही ग्रामपंचायतींना पंचायत समिती सभापती श्री. शंकर घारे, उपसभापती श्री. सचिन देसाई, गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक, सहा. गटविकास अधिकारी श्री. दिनेश पाटकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. संध्या मोरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.













