राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ले कार्यालयाचे उद्घाटन

वेंगुर्ले : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ला कार्यालयाचे उद्घाटन राऊळवाडा वेंगुर्ले या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड. जी. जी. टांककर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा सचिव सुशील चमनकर, ॲड.मनीष सातार्डेकर, तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर , तालुका सचिव सचिन कोंडये, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर , माजी उपसरपंच गणपत केळुस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोठे, माजी सरपंच सौ .नेहा अन्सुरकर, ज्ञानेश्वर अन्सुरकर, तातोबा नार्वेकर, श्याम नवार , तालुका युवा अध्यक्ष गजानन कुंभार, स्वागत कवठणकर, श्रेयस टाककर, राजेंद्र आंब्रे, सचिन पेडणेकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.