पळसंब शाळा प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर : लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या

पळसंब शाळा न. १ च्या प्रवेशद्वारचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात सपन्न झाला.

प्रमुख पाहुणे उद्योजक श्री. सचिन माणगावकर, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून लोकर्पण करण्यात आले.

त्यावेळी सरपंच श्री. अविराज परब, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, केंद्रप्रमुख श्री. देऊ जंगले, सौ . सरिता पवार, श्री. रविकांत सावंत, श्री. मुख्याध्यापक विनोद कदम, माजी उपसभापती श्री. अशोक बागवे श्री. दिगबर साटम श्री. प्रमोद सावंत सुशोभिकरण अध्यक्ष .श्री पिठ्या सावंत, खाजिनदार श्री. रमेश परब, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत गोलतकर, माजी सरपंच सौ. पुनम गोलतकर, पोलीस पाटील अनुष्का परब, पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, विपूल जुवेकर, श्री.सुरेश गावकर, श्री. अरुण पुजारे, राजन पुजारे, अनिल पुजारे, दिवाकर पुजारे, देवस्थान मानकरी श्री. सावंत गुरुजी, श्री. राजेद्रप्रसाद गाड, अपूर्वा पवार, माजी शिक्षक सौ. सोनगट्टे मॅडम, सौ. गवाणकर मॅडम, मधुकर परब, विजय पुजारे, दशरथ सावंत, सुनिल मुणगेकर,रमेश मुणगेकर, रामकृष्ण पुजारे, अमरेश पुजारे,अमित पुजारे, प्रमोद पुजारे,अरुण पुजारे,पंचक्रोशीतील शिक्षक ग्रामस्थ महिला मुले मोठया संख्येने उपस्थित होती

शाळेच्या मुलांनी लेझिन नृत्य सादर करत कार्यक्रमांत शोभा वाढवली

तसेच उपस्थित मान्यवरानी पळसंब गावाच्या एकजुटीचे कौतुक करत लोकसहभागातून उभारलेल्या प्रवेशद्वाराचे कौतूक करत असे प्रवेशद्वार मराठी शाळेचे सिंधुदुर्गात कुठे पाहायला मिळाले नाही असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.

रात्रौ दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ यांच्या नाटय प्रयोगाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

त्यावेळी गावातील रहिवाशी मुंबईकर चाकरमानी माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.सर्व दात्याचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले .