*एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कणकवलीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र परिक्षेत नेत्रदिपक यश. १५ विद्यार्थी विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत*
एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कणकवलीच्या वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या सन २०२५-२६ च्या प्रथम सत्र परिक्षे निकाल जाहीर झाले असून, महाविद्यालयात असलेल्या सर्व अभियांत्रिकी शाखांमधील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे.
कॉम्प्युटर सायन्स या शाखेमध्ये कुमारी सुहानी केरकर, वास्को, गोवा हीने ९.८२ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात पहीला क्रमांक पटकावला, कुमार अथर्व नितीन पारकर, राधानगरी, कोल्हापुर यांनी ८.६५ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला, कुमारी तुळपुले साक्षी विद्याधर , आडवली , मालवण, हीने ८.५६ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात तीसरा क्रमांक पटकावला
कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरींग – आर्टीफीशीअल इंटेलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग या शाखेमध्ये कुमारी कांदळगावकर अपेक्षा अशोक, आचरा, मालवण हीने ९.८१ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात पहीला क्रमांक पटकावला, कुमारी कुडतरकर अनुष्का महेंद्र , तोंडवली, मालवण ,हीने ९.६५ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात तिसरा क्रमांक पटकावला, कुमार पांडीलवाल विठ्ठल शेशेराव, नायगाव , नांदेड, याने ९.०४ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात चौदावा क्रमांक पटकावला
इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग या शाखेमध्ये कुमारी मोरजकर तन्वी प्रदीप, पेंडुर, वेंगुर्ला, हीने ८.८६ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात तीसरा क्रमांक पटकावला, कुमारी तांबे मानसी संतोष , हरकुळ, बु., कणकवली, हीने ८.७८ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात चौथा क्रमांक पटकावला, कुमारी सावंत रसीका दिपक, साकेडी ,कणकवली, हीने ८.७८ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात चौथा क्रमांक पटकावला, कुमारी घाडीगावकर वेदीका हेमंत , आडवली, मालवण , हीने ८.६३ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात सहावा क्रमांक पटकावला..
इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स या शाखेमध्ये कुमारी रॉड्रीग्ज स्टेफी फेलिक्स, चराठा, सावंतवाडी हीने, ८.५६ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात सहावा क्रमांक पटकावला, कुमार राणे तन्मय संतोष, मिठबाव, देवगड याने, ८.४७ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात नऊवा क्रमांक पटकावला, कुमारी वाळके आर्या हेमंत, भालचंद्रनगर, कणकवली, हीने ८.३४ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात चौदावा क्रमांक पटकावला.
कॉम्प्युटर इंजिनीअरींग या शाखेमध्ये कुमारी मिठबावकर श्रीया तुषार, वागदे ,कणकवली, हीने ९.१७ पॉइंटर मिळवत महाविद्यालयात पहीला क्रमांक पटकावला, कुमार मोंडे यज्ञेश सिताराम, पालघर,ठाणे याने ८.८६ पॉइंटर मिळवत महाविद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला, कुमार सरमळकर राधाकृष्ण, म्हापण, वेंगुर्ला याने ९.०४ पॉइंटर मिळवत महाविद्यालयात तीसरा क्रमांक पटकावला
मेकॅनिकल इंजिनीअरींग या शाखेमध्ये कुमार केसरकर विनायक सुर्यकांत ,तळगाव, मालवण, याने, ८.८२ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात सातवा क्रमांक पटकावला, कुमार कोरगावकर सर्वेश सुजीत प्रभादेवी, मुंबई, याने, ८.१७ पॉइंटर मिळवत मुंबई विद्यापीठात तीसावा क्रमांक पटकावला, कुमार राऊळ साहील शरद , लक्ष्मीनगर सावंतवाडी याने ७.३४ पॉइंटर मिळवत महाविद्यालयात तिसरा क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे ९५ विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. एस. बाडकर यांनी राबविलेल्या नाविन्यपुर्ण संकल्पनांमुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळविण्यात मदत झाली आहे. याकरीता प्रथमवर्ष विभागाचे विभाग प्रमुख प्रा. ओंकार साळवी यांच्यासह सर्व विषय शिक्षकांचे विशेष योगदान लाभले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबददल् महाविद्यालयाचे संस्थापक सन्मा. नारायणरावजी राणे साहेब, अध्यक्षा सन्मा. सौ. निलमताई राणे मॅडम, उपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणेसाहेब व सचिव सन्मा. नितेशजी राणेसाहेब यांनी विशेष कौतुक केले आहे.












