मसुरे | झुंजार पेडणेकर :सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबईच्या बदलापूर (पूर्व) येथील स्थलांतरित शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा १६ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी धार्मिक विधी आणि दुपारी औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
सकाळी १०:०० वाजता सत्यनारायण महापूजा होईल, तर दुपारी १२:३० वाजता शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडेल. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभा सदस्य आ. श्री. किसनराव कथोरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. हरिष परब भूषवणार आहेत.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रुचिता राजेंद्र घोरपडे (नगराध्यक्ष, कुळगाव बदलापूर नगर परिषद),
श्री. कॅप्टन आशिष दामले (अध्यक्ष, परशुराम आर्थिक विकास महामंडळ – कॅबिनेट मंत्री दर्जा),
सौ. प्रियांका आशिष दामले (उपनगराध्यक्ष, कुळगाव बदलापूर नगर परिषद).
नवीन पत्ता
बँकेची ही शाखा आता राजगुरू पाटील पॅराडाईज, तळमजला नं. १, विवेकानंद नगर, कॅप्टन किंग रोड, अंबिका हॉटेलसमोर, बदलापूर स्टेशन रोड, बदलापूर (पूर्व) येथे कार्यरत होईल.
या सुसज्ज आणि अद्ययावत शाखेमुळे बदलापूरमधील ग्राहकांना अधिक दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत. बँकेचे उपाध्यक्ष श्री. दिनकर हि. तावडे, मुख्य सरव्यवस्थापक श्री. प्रशांत प्र. शिंदे, शाखा व्यवस्थापक मा. श्री. दीपक ठुकराल आणि संचालक दिवाकर दळवी,श्री. शरदचंद्र एस. देसाई,
श्री. श्रीकृष्ण द. परब,
श्री. चंद्रप्रकाश बी. जैन,
श्री. विजय बी. नाईक,
श्री. स्वप्नीक एस. फाटक, श्री. मोहन भा. तळेकर,श्री. विलास जे. परब,श्री. संभाजी एस. मंडले, श्रीमती प्रतीक्षा प्र. परब, स्थानिक सल्लागार समिती सदस्य सिंधुदुर्ग सहकारी बैंक लिमिटेड, मुंबई यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.












