पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यामधे सात मंडलामध्ये प्रशिक्षणाची सुरूवात

रत्नागिरी । प्रतिनिधी :

रत्नागिरी: पंडित दीनदयाळ उपाध्याय महा अभियान रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यामधे काल सात मंडलामध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेची सुरूवात झाली.
चिपळूण शहर, संगमेश्वर उत्तर, संगमेश्वर दक्षिण, रत्नागिरी मध्य, रत्नागिरी शहर, लांजा उत्तर, लांजा दक्षिण मंडलामधील सुमारे 500 हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या प्रशिक्षण वर्गामध्ये सामील झाले होते.
या प्रशिक्षण शिबिरात भारतीय जनता पार्टीचा इतिहास, वैचारिक अधिष्ठान, कार्यविस्तार आणि दृष्टिकोन, आपली कार्यपद्धती, सोशल मीडिया, मन की बात आणि आगामी कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रत्येक मंडलातून 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या प्रशिक्षण अभियानामुळे भारतीय जनता पार्टीचे विचार सर्व दूर पसरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी, संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे.
प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्टात हे अभियान राबविले जात आहे. भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी यादव साहेब विशेष मेहनत घेऊन हे अभियान यशस्वीपणे पार पडेल यासाठी स्वतः सर्व ठिकाणी उपस्थीत रहात आहेत. काल दि. १४ मार्च रोजी रत्नागिरी मध्य मंडल यांचे म्हाबळे संगमेश्वर येथे प्रशिक्षण वर्गाचे ऊद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस मध्य मंडल तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई , संयोजक संकेत कदम, तालुका सरचिटणीस राजेश आंबेकर, महीलाध्यक्षा सुचिता नाचणकर, जि. उपाध्यक्ष बावा नाचणकर, संदिप सुर्वे आणि जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके उपस्थित होते. त्यानंतर रत्नागिरी शहर मंडल मध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण स्थळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी भेट दिली, यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.वर्षाताई ढेकणे, महिला शहर अध्यक्षा सौ.भक्तीताई दळी, संयोजक सौ.मुक्ता बाष्टे सरचिटणीस बाबू सुर्वे, निलेश आखाडे , बाबा परूळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी तिथे मांडण्यात आलेल्या प्रदर्शनीला देखील जिल्हाध्यक्षांनी भेट दिली. या अभियानातील पहिल्या भागात सात मंडलांनी तसेच पुढील भागात पाच मंडले सदर प्रशिक्षण वर्ग घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगीतले.