पाचल वार्ताहर :महाराष्ट्रात दुर्मिळ होत असलेला सुदंर, रुबाबदार, देखना असलेला शेखरु प्राणी सहजासहजी कुठे आढळत नाही. शेखर हा प्राणी सातारा, कोल्हापूर आणि भीमाशंकरच्या घनदाट अशा जंगलात आढळतो. मात्र आज तो दुर्मिळ दिसणारा हा प्राणी तळवडे गावातील रबसेवाडीतील श्री. भालचंद्र शांताराम रबसे यांच्या घराच्या कौलावर मुक्तपणे संचार करताना दिसला. शेखरु प्राण्याला पाहण्यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मानसांची चाहुल लागताच झाडावरून उड्या मारत अखेर बाजूच्या जंगलात पळायन केले.












