राजापूर (वार्ताहर): चैत्र शु.प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे गुरूवारी राजापूरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा काढून स्वागत करण्यात आले.
ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथुन या यात्रेचा शुभारंभ झाला. मोहन घुमे यांचे हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. दत्तात्रय रानडे यानी पौराहित्य केले.

त्यानंतर स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेचा प्रारंभ झाला. याप्रसंगी विनोद गादीकर, हिंदवी स्वराज प्रतिष्ठानचे महेश मयेकर, दिलीप चव्हाण, श्रृती ताम्हनकर, संदेश टिळेकर, विवेक गुरव, अनंत रानडे, दिलीप गोखले, नागेश शेटये, अविनाश पाटणकर, प्रसन्न देवस्थळी, डॉ. शुभम कुशे, एड. प्रशांत पाध्ये, गणपत बुचडे आदी उपस्थीत होते.
मुख्य रस्ता, शिवस्मारक, छत्रपती संभाजीपेठ, बाजारपेठ, बंदरधक्का, गणेशघाट, छत्रपती शिवाजीपथ मार्गे श्री देव चव्हाटा देवस्थान अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. स्वागत यात्रा जवाहरचौक शिवस्मारकाजवळ आल्यावर स्वागतयात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुशे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांच्या हस्ते शिवपुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या शोभायात्रेत नागरिकांनी पारंपारिक वेषभुषा सादर करत शोभायात्रेची शोभा वाढविली. यावेळी जय श्रीराम,छत्रपति शिवाजी महाराज की जय,जय भवानी अशा घोषाणांनी शहर दणाणून गेले होते. शोभायात्रेत सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, हिंदवी स्वराज प्रतिष्ठान, शिवस्मृती मंडळ यांसह विविध हिंदु संप्रदाय व संघटना सहभागी झाल्या होत्या. या स्वागतयात्रे दरम्यान प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय संस्थेच्या वतीने गुढीपाडवा आणि आरोग्य या विषयीचे महत्व विशद केले.
श्री देव चव्हाटा मंदिर येथे महाआरतीने या यात्रेची सांगता झाली. या ठिकाणी सर्वांनी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तर ब्रम्हाकुमारी विद्यालयाच्या वतीने नशामुक्ती शपथ देण्यात आली.
फोटो 19 आरजेपी 8।9।10
हिंदु नववर्ष स्वागतयात्रा समीतीच्या वतीने राजापूरात नववर्ष शोभायात्रा काढण्यात आली. पहिला छायाचित्रात यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना राजेंद्र कुशे, दुसऱ्या छायाचित्रात शोभयात्रेत सहभागी हिंदु बांधव तर तिसऱ्या छायाचित्रात शोभायात्रे दरम्यान शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करताना राजेंद्र कुशे, महेश मयेकर.












