सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे

जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा गतिमान विकास हेच लक्ष!

विकासकामांचा झंझावात कायम राहणार ; निधीची कमतरता भासू देणार नाही

आ. निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन कांदळगावचे उबाठा गटाचे सरपंच, उपसरपंचांसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

हडी व कोळंब गावातील अनेक ग्रामस्थ व युवा कार्यकर्त्यांनीही केला शिवसेनेत प्रवेश

आ. निलेश राणे, उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत

उबाठा गटाला गळती लागली असून अनेक प्रक्ष प्रवेश वेटिंगवर : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

मालवण | प्रतिनिधी : कांदळगावाचे देव रामेश्वर हे आमच्या कुटुंबाचे श्रद्धास्थान आहेत. राणे साहेबांच्या भाषणात नेहमी देव रामेश्वर हा उल्लेख असतोच. श्री रामेश्वर देवतेची कृपा आणि सिंधुदुर्गातील जनतेचे आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत आहेत. सिंधुदुर्गातील जनतेच्या सेवेसाठी माझे उर्वरित आयुष्य समर्पित असून, जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा गतिमान विकास सुरूच राहील. मालवण कुडाळचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले प्रमुख ध्येय आहे. विकासकामांचा झंझावात यापुढेही कायम राहणार असून, कोणत्याही विकासकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा ठाम निर्धार आमदार निलेश राणे यांनी कांदळगांव येथे व्यक्त केला. दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्याने प्रेरित होऊन मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील उबाठा गटाचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी व सहकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच हडी व कोळंब गावांतील अनेक ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

आमदार निलेश राणे यांच्या झंजावाती विकास कार्यावर प्रेरित होऊन तसेच कांदळगावातील रखडलेल्या विकास कामांना गति प्राप्त होण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे उबाठा गटाचे कांदळगावचे सरपंच रणजित परब, उपसरपंच राजेंद्र कदम व प्रवेशकर्ते यांनी सांगितले.
गावातील साळकरवाडी ते राणेवाडी बंधारा कम रस्ता उभारणी झाल्यास शेती, पर्यटन व रोजगार निर्मितीतून
गांव अधिक समृद्ध होईल असे सरपंच रणजित परब यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायतला अधिक शासकीय जागा उपलब्ध झाल्यास बहुउद्देशीय इमारत क्रीडांगण उभारणी करून रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. यासह युवकांना रोजगार व अन्य विकास कामाबाबत सरपंच यांनी भूमिका मांडली. आमदार निलेश राणे यांनी सर्व विकासकामे मार्गी लावली जातील असे सांगितले. तसेच बंधारा उभारणी बाबत अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून अंदाजपत्रक ही तयार करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करतं शासन स्तरावरून लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ग्रामपंचायतला आवश्यक असणारी अधिक जागाही उपलब्ध करून दिली जाईल. येथील बचत गटांना आवश्यक असणारा हॉल उभारणीही होईल. गावातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील असा शब्द आमदार निलेश राणे यांनी कांदळगांव वासियांना दिला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उपजिल्हाप्रमुख महेश राणे, विश्वास गांवकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर प्रमुख राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, पस सदस्य गणेश तोंडवळकर, विभागप्रमुख संतोष पालव, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, बाबू राणे, संतोष पारकर, माजी सरपंच उमदी परब, ग्रापं सदस्य शारदा मूळये, उमेश कोदे, विहार कोदे, राजेंद्र कदम, आचरा सरपंच जेरोण फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, जय परुळेकर, युवासेना माजी जिल्हाप्रमुख उद्योजक संग्राम साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, राजेश गांवकर, मनोज हडकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक यांसह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन कदम यांनी केले.

प्रवेशकर्ते : कांदळगाव-हडी व कोळंब

कांदळगाव सरपंच रणजित परब, उपसरपंच राजेंद्र कदम, सदस्य अनघा कदम यांसह सुशांत कांदळकर, संदीप परब, प्रणित परब, केशव परब, अक्षय परब, प्रथमेश परब, सत्कार पाटकर, रुपेश लाड, दिवेश परब, तुकाराम परब, रोहित परब, आनंद पाटकर, नंदकिशोर परब, स्वप्नील परब, उमेश परब, तुकाराम लाड, प्राजक्ता परब, काजल परब, सुचिता पाटकर, हर्षदा पाटकर, वैशाली परब, राजश्री लाड, प्रमिला लाड, राज साटम, प्रिती परब, श्रद्धा परब, रोहिणी परब, छाया परब, प्रणय परब यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच हडी लाडवाडी येथील सचिन लाड, सुनंदा लाड, प्रशांत लाड, प्रतिक्षा लाड, ओंकार काशीद, सुंदर लाड, सुगंधी लाड, सुनिल लाड, स्मिता लाड, महेश लाड, मीनल लाड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कोळंब येथील युवा कार्यकर्ते यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

आ. निलेश राणे विकासाचे व्हिजन असणारे हक्काचे नेतृत्व: उपनेते संजय आंग्रे

आमदार निलेश राणे हे विकासाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन असणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले हक्काचे नेतृत्व आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची असलेली तत्परता, जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत त्यांचा घुमणारा आवाज, विकासकामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सर्वसामान्यांशी जपलेली नाळ यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण कुडाळच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळत असल्याचे शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी सांगितले.

उबाठा गटाला गळती अनेक प्रक्ष प्रवेश वेटिंगवर : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका, विकासाचे व्हिजन व दूरदृष्टी तसेच विधानसभेतील अभ्यासू भाषणे व आग्रही भूमिका पाहता सर्वांनाच आमदार निलेश राणे यांची भुरळ पडली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांचा दहा वर्षातील अपयशी कार्यकाळ जनतेसमोर आला आहे. शिवसेनेत मोठया संख्येने पक्षप्रवेश होत आहेत. उबाठा गटाला गळती लागली असून अनेक प्रक्ष प्रवेश वेटिंगवर असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

फोटो : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन कांदळगावचे उबाठा गटाचे सरपंच रणजित परब, उपसरपंचांसह राजेंद्र कदम, ग्राप. सदस्य अनघा कदम यांसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. (अमित खोत, मालवण)