गोवत्स पूजनातून भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन; लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
कुडाळ : श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमात लाभार्थ्यांसमवेत वसुबारस व धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी पारंपरिक पद्धतीने गोवत्स पूजन करून गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भारतीय संस्कृतीत गायीला असलेले अनन्यसाधारण महत्त्व तसेच वसुबारस सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. सेवाश्रमातील लाभार्थ्यांनाही या सणाच्या आनंदात सहभागी करून घेत सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
या प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष राजू बिर्जे, सचिव संदीप बिर्जे, खजिनदार साक्षी बिर्जे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बिर्जे, श्रीमती गौरी नाईक, सौ. सीमा सुरेश राऊत यांच्यासह बिर्जे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सेवाश्रमात विविध सण व उत्सव लाभार्थ्यांसमवेत साजरे करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या उपक्रमातून भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासोबतच लाभार्थ्यांना आपलेपणाची भावना देण्याचे कार्य होत असून, हा सण सर्वांसाठी आनंददायी आणि समाधानकारक ठरला.













