देवगडमध्ये महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन निवडणुकीत ६५ टक्के मतदान

देवगड येथे महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीत उत्साहात मतदान पार पडले. एकूण ५८ वकील मतदार म्हणून नोंदणीकृत होते, त्यापैकी ३८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे देवगडमध्ये सुमारे ६५ टक्के मतदान नोंदले गेले.

मतदान प्रक्रिया आज सकाळी १० वाजता सुरू झाली. देवगड वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. देवानंद गोरे यांनी सर्वप्रथम मतदान करून प्रक्रियेची सुरुवात केली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरळीतपणे पार पडले.

या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रप्रमुख म्हणून सुरेंद्र जाधव आणि श्री. हरम यांनी जबाबदारी पार पाडली.

दरम्यान, या निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतून एकूण १५५ उमेदवार रिंगणात उतरले होते.