आ. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक निधीतून तालुक्यातील आठ शाळांना डिजिटल साहित्य वाटप

भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर यांचे विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा

लांजा (प्रतिनिधी ) कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील आठ शाळांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले. भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे साहित्य उपलब्ध झाले.
आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील शाळांनाही डिजिटल साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर यांनी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे लांजा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद शाळांना डिजिटल संगणक साहित्य उपलब्ध झाले होते.‌ यामध्ये जि प शाळा आरगाव नंबर १, जि प शाळा वाघणगाव नं.१, , जि प शाळा विलवडे नं.१ आणि २, जि प शाळा विलवडे सुतारवाडी, जि प शाळा आरगाव देवमळा, जि प शाळा पुनस कडूगाव आणि जि प शाळा वाकेड नं.२ या आठ शाळांना हे डिजिटल संगणक साहित्य मंजूर झाले होते.‌ या शाळांना नुकतेच या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्या सौभाग्यवती सौ. निलीमा डावखरे, भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, लांजा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते