कांदळगाव येथे 26 मार्च रोजी रामनवमी उत्सव!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देवस्थानच्या वतीने २६ मार्च रोजी राम नवमी निमित्त श्री रामेश्वर देवालयात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिवर्षा प्रमाणे गुढी पाडाव्या पासून रामनवमी पर्यंत श्री देव रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव साजरा केला जातो. मंदिरात गुढीपाडव्या पासून नऊ दिवस रात्री पुराण वाचन, पालखी सोहळा, व कीर्तन सादर केली जाते. २६ मार्च रोजी रामनवमी निमित्त सकाळी ११ वाजता राम जन्मावर आधारित कीर्तन, दुपारी १२.३५ वाजता राम जन्म त्यानंतर पालखी प्रदीक्षिण, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता पुराण वाचन, पोथी पूजन, पालखी प्रदीक्षिणा, कावले मित्रमंडळ हडी यांचा मर्दानी खेळ, कीर्तन व त्यानंतर न्हीवे वाडी यांचे नाट्य पुष्प सादर केले जाणार आहे. शुक्रवार २७ रोजी सकाळी ७.३० वाजता लळीतोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.