पेट्रोल पंपात इंधनाचा तुटवडा, रिक्षा चालक मालक संघटनेचे तहसिलदारांना निवेदन नियमीत पुरवठ्याची मागणी

मंडणगड | प्रतिनिधी : शहरातील पेट्रोल पंपामध्ये गेल्या काही महिन्यापासून इंधन तुटवड्याची समस्या वारंवार जाणवत असल्याने रिक्षा चालकांची मोठी गैससोय होत असल्याने रिक्षा चालक मालक संघटनेचेवतीने 7 ऑगस्ट 2023 रोजी मंडणगड तहसिल कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष विनोद जाधव व सर्व सभासदांनी तहसिलदार श्री. तानाजी शेजाळे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडत निवेदन सादर केले निवेदनातील माहीतीनुसार तालुक्यातील रिक्षा व्यवसाईक व्यवसायाच्या माध्यमातून जनसेवा करीत आहेत. सर्व व्यवसाईक हे कर्ज काढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. तालुक्यातील पेट्रोल पंपावर गेल्या अनेक वर्षांपासून इंधनाचा तुटवडा भासत आहे. अनियमीत इंधन पुरवठा होत असल्याचा मोठा परिणाम व्यवसायावर होत आहे.

त्यामुळे कर्जाचे हप्ते व कुटुंबाचा उदर निर्वाह करणे कठीण होत असल्याने रिक्षा व्यवसाईकांची मानसिकता ढासळत चाललेली आहे. तालुक्यातील ग्राहक, अपंग नागरीक, जेष्ठ नागरीक, रुग्ण, शाळकरी विद्यार्थी, गर्भवती महिला यांना रिक्षा सेवा देता येत असल्याने यांचीसुध्दा मोठी गैरसोय होत आहे. असे निवेदनात नमुद करीत प्रमुख चार मागण्यात करण्यात आल्या आहेत. यात व्यवसाईकांना सुरळित इंधन पुरवठा व्हावा, पेट्रोल पंपावर सौजन्य पुर्वक वागणुक मिळावी, स्थानीक रिक्षा व्यवसाईकांना पंपामध्ये वेगळी रांग करुन सेवा मिळावी, पंपावर होत असणारी कृत्रिम इंधन टंचाई व काळ्या बाजाराने चढ्या भावाने होत असलेली इंधन विक्री याची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही व्हावी या मागण्यांचा समावेश आहे.
फोटो ओळी- तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे निवेदन सादर करताना रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विनोद जाधव व पदाधिकारी