लांजा (प्रतिनिधी): आगामी ‘जनगणना २०२६’ च्या
कामातून दिव्यांग कर्मचाऱ्यांना पूर्णपणे वगळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा रत्नागिरी त्यांच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
राष्ट्रीय मोहिमेसाठी प्रशासकीय स्तरावर नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या प्रक्रियेत रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश केला जात असल्याने ‘महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा रत्नागिरी’ यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना या कामातून पूर्णपणे वगळण्यात (Exempt) यावे,
अशी मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता, दुर्गम आणि डोंगराळ भागात विखुरलेल्या वस्त्यांमध्ये जाऊन जनगणनेचे काम करणे दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे. चालणे, चढणे किंवा दीर्घकाळ प्रवास करणे त्यांच्यासाठी शारीरिकदृष्ट्या शक्य नाही.दिव्यांग हक्क अधिनियम २०१६’ आणि केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य व शारीरिक स्थितीचा विचार करून त्यांना अशा कठीण कामांतून सूट देण्याचे निर्देश आहेत.
जनगणना यामध्ये क्षेत्रीय किंवा कार्यालयीन काम दिल्यास कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे
जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या आणि
संघटना अध्यक्ष विलास गोरे व जिल्हा सरचिटणीस आनंद त्रिपाठी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांना या राष्ट्रीय कर्तव्यातून सवलत देऊन सहकार्य करावे. जिल्हा प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती संघटनेने केली आहे.
Home महत्वाच्या बातम्या जनगणना २०२६’ च्या कामातून दिव्यांग कर्मचाऱ्यांना पूर्णपणे वगळा महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग)...












