राजापूर / प्रतिनिधी :
उत्तराखंड राज्यातील उध्दमसिंग नगर जिल्ह्यातील गदरपूर तालुक्याचा तरुण रणवीर सिंग सध्या सायकलवरून भारतातील ऐतिहासिक किल्ल्यांचा अनोखा प्रवास करत असून त्याच्या या धाडसी मोहिमेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील तब्बल ३१५ किल्ल्यांचा प्रवास करण्याचे उद्दिष्ट ठेवून रणवीर सिंगने एक वर्षाची ही मोहीम हाती घेतली आहे.
या प्रवासाची सुरुवात दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी येथून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून प्रारंभ करून रणवीर सिंगने महाराष्ट्रातील विविध दुर्गम किल्ल्यांची सफर सुरू केली. गुरूवारी ताे राजापूर शहरात आला होता. यावेळी शिवप्रेमींनी त्याचे स्वागत केले.
त्याच्या नियोजनानुसार महाराष्ट्रातील सर्व प्रमुख किल्ल्यांना भेट दिल्यानंतर तो पुढे (तामिळनाडू) येथे पोहोचणार आहे. विशेष म्हणजे हा किल्ला सर केल्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्रात येऊन येथे प्रवासाचा समारोप करणार असून त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
सध्या रणवीर सिंग कोकण पट्ट्यात प्रवेश करून पालघरपासून सागर किनाऱ्यालगतचा प्रवास करत दक्षिणेकडे मार्गक्रमण करत आहे. पुढील दोन महिने महाराष्ट्रातच विविध किल्ल्यांचा अभ्यास व प्रवास करणार असल्याची माहिती त्याने बोलताना दिली आहे.
इतिहास आणि साहस यांची सांगड घालत सायकलवरून इतक्या मोठ्या प्रमाणात किल्ल्यांचा प्रवास करण्याचा त्याचा प्रयत्न प्रेरणादायी मानला जात आहे. या मोहिमेद्वारे तो युवकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले जाते.













