राजापूर (वार्ताहर): विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणूका पुढील महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामध्ये तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीतील २१ जागांसाठी निवडणूका होणार आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक निमित्ताने गावा-गावातील राजकारण तापणार आहे.
या निवडणूकीसाठी 7 ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणे, 15 एप्रिलला उमेदवारी अर्ज छाननी, 17 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे तर, 28 एप्रिल ला मतदान आणि 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
विविध कारणानिमित्ताने रिक्त राहीलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणूकीचा निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीमध्ये कोळवणखडी प्रभाग-1 (सर्वसाधारण), प्रभाग-2 (नामप्र महिला), नाणार प्रभाग-1 (नामप्र महिला), झर्ये प्रभाग-2 (अनुसूचित जाती), प्रभाग-2 (नामप्र महिला), वडदहसोळ प्रभाग-3 (नामप्र महिला), येळवण प्रभाग-3 (अनसूचित जाती), हातिवले प्रभाग-3 (सर्वसाधारण महिला), खरवते प्रभाग-2 (सर्वसाधारण महिला), केळवली प्रभाग-2 (सर्वसाधारण महिला), प्रभाग-3 (सर्वसाधारण महिला), केळवली प्रभाग-4 (सर्वसाधारण महिला), माडबन प्रभाग-3(सर्वसाधारण महिला), भालावली प्रभाग-1 (सर्वसाधारण), कळसवली प्रभाग-3(सर्वसाधारण), प्रभाग-3 (सर्वसाधारण महिला), कोंड्येतर्फ सौंदळ प्रभाग-2 (नामप्र महिला), कोंड्येतर्फ सौंदळ प्रभाग-3 (सर्वसाधारण), साखर प्रभाग-3 (नामप्र), प्रिंदावण प्रभाग-2 (सर्वसाधारण), धाऊलवल्ली प्रभाग-3 (सर्वसाधारण) अशा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीमधील 21 जागांचा समावेश आहे.
या निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावा-गावातील राजकीय वातावरण तापणार असून संभाव्य उमेदवारांचा शोध घेण्याची मोहिम राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे.













