राजापूर शहरातील विविध प्रभागांतील विकास कामांचा माजी आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते शुभारंभ

भाजपाच्या विशेष प्रयत्नाने विकास कामांना निधी मंजूर
राजापूर प्रतिनिधी :भाजपाच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्याने शासनाच्या नागरी सेवा सुविधा २०२४–२५ योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेल्या राजापूर नगरपरिषदेच्या शहरातील विविध प्रभागांतील विकास कामांचा शुभारंभ नुकताच भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपाच्या महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, जिल्हा सरचिटणीस व पंचायत समिती उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा उपाध्यक्ष सौ. शितल पटेल, तालुकाध्यक्ष मोहन घुमे, शहराध्यक्ष किरण शिवलकर, भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश सचिव अनिल करंगुटकर, नगरसेवक सुयोगा जठार, संदीप तेरवणकर, संदेश आंबेकर, महेश मणचेकर, सुनील पटेल, राजा खानविलकर, सोनल केळकर, रेणुका गुंडये, शितल गोटणकर, शितल रहाटे, विवेक गुरव, विद्या गुरव, अजय डंबे, राजा काजवे, नागेश शेटे, स्नेहा रहाटे, तनिष्का डंबे, सुधा चव्हाण, यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व विकास कामांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंजुरी मिळाली असून, माजी आमदार प्रमोद जठार व तालुका भाजपाच्या वतीने यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १, ३, ४, ५, ६ व ८ मधील विविध रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, घाट बांधकाम, संरक्षक भिंती उभारणे तसेच मैदान व परिसर सुशोभीकरण यांसारख्या कामांचा समावेश आहे. विशेषतः वरचीपेठ, गुरववाडी, भटाळी, साखरकरवाडी, कोंडेतड आदी भागांतील नागरिकांना या कामांचा थेट लाभ होणार आहे. एकूण सुमारे १७ ते १८ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून, या कामांमुळे राजापूर शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.