उद्योजक मंगेशभाई बुटाला यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) : सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच उद्योजक श्री. मंगेशभाई बुटाला यांचा वाढदिवस खेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. अरुण उर्फ अण्णा कदम, सौ. अनिता काकी कदम, नगराध्यक्ष सौ. माधवी राजेश बुटाला, पंचायत समिती सदस्य श्री. संग्राम कदम, नगरसेवक श्री. प्रेमळ चिखले, सहजीवन हायस्कूलचे चेअरमन श्री. राजेश बुटाला, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. दर्शन महाजन, युवासेना शहरप्रमुख श्री. सिद्धेश खेडेकर, श्री. साई खेडेकर, श्री. नंदेश खेडेकर, श्री. राकेश सागवेकर, श्री. साहिल बुटाला तसेच श्री. दामले साहेब, सौ. दामले आणि बुटाला कुटुंबीय उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्री. बुटाला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना शिक्षण व समाजकार्यातील त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाखाली सहजीवन शिक्षण संस्था सातत्याने प्रगतीपथावर असून समाजहितासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम उत्साहात पार पडत सर्वांनी त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.