बँक ऑफ महाराष्ट्र च्या ए.टी.एम मध्ये दुर्गंधी माखजनकर हैराण

गौरव पोंक्षे माखजन:
‘मुद्रेयं लोकमङगला’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र ,माखजन शाखेच्या खालती असलेल्या ए टी एम मध्ये दुर्गंधी चा कळस झाला आहे.पैसे काढण्यापुरत्या वेळेसाठी आतमध्ये उभे राहणे ग्राहकांना जिकिरीचे झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजार पेठेत असलेल्या ह्या ए टी एम मध्ये,प्राण्याची विष्ठा,कुजलेल्या प्राण्यांचे वास अस एकत्रित पणे किळसवाणे वातावरण झाले.
गेले कित्येक महिने ही परिस्थिती जैसे थे असून,येथील ब्रांच मॅनेजर याकडे दुर्लक्ष करत आहेत.येथील अनेकदा वाता नुकूलीत प्रणाली देखील बंद पाहायला मिळते.ना स्वच्छता,ना सेवा, अशा दुहेरी विळख्यात हे ए.टी.एम केंद्र सापडले आहे.
या ए.टी.एम.ची तात्काळ स्वछता करावी अशी मागणी येथील परिसरातील ग्राहकातून होत आहे.
माखजन दशक्रोशीतून अनेक नागरिक याठिकाणी येत असतात.आजू बाजूच्या १५ किलोमीटर मध्ये ए.टी.एम सुविधा नसल्याने ग्राहकांना दुसरा पर्याय नाही.बँक ऑफ महाराष्ट्र च्या गलिच्छ सेवेला ग्राहक कंटाळलेले पाहायला मिळत आहेत