छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शुभारंभ
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
राजापूर प्रतिनिधी: राजापूर नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला बुधवार १ एप्रिल पासून शानसदार प्रारंभ झाला आहे. नगर परिषदेचा हा १५० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या हस्ते व सर्व नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
राजापूर नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला बुधवार १ एप्रिल पासून प्रारंभ झला आहे. याचे औचित्य साधून नगर परिषदेच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी शहरातील विविध शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शहरात प्रभात फेरी काढली. तर नगर परिषदेच्या वतीने श्री सत्यनारायण महापुजेचेही आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनानिमित्त नगर परिषदेत आकर्षक अशी रांगोळीही रेखाटण्यात आली होती.
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राजापूर नगर परिषदेने नव्याने घेतलेल्या व्हॅक्युम क्लीनर गाडीचा शुभारंभ करण्यात आला. नगर परिषदेचे आरोग्य सभापती सुलतान ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आले. या गाडीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी उपनगराध्यक्ष विनय गुरव यांसह काँग्रेसचे गटनेते एड. जमिर खलिफे, शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे यांसह सर्व नगरसेवक तसेच माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, शीतल पटेल, कल्याणी रहाटे, सुभाष पवार, माजी मुख्य लिपिक किशोर जाधव, विलास करंजवकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी शहरवासीयांना १५० व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
फोटो 1 आरजेपी 4।5।6
राजापूर नगर परिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे याप्रसंगी सर्व नगरसेवक तर दुसऱ्या छायाचित्रात सर्व सहकारी नगरसेवक महिलांसोबत नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे तर शेवटच्या छायाचित्रात व्हॅक्युम क्लीनर गाडीचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करताना सुलतान ठाकूर याप्रसंगी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांसह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी वर्ग.
Home महत्वाच्या बातम्या राजापूर नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला बुधवार १ एप्रिल पासून प्रारंभ












