वेंगुर्लेत नाईक जिम अँड फिटनेस सेंटर येथे हनुमान जयंती निमित्त पॉवरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले येथील नाईक जिम अँड फिटनेस सेंटर येथे हनुमान जयंती निमित्त जिम मर्यादित पॉवरलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा समन्वयक श्री सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर श्री देव हनुमान यांचे मूर्तिपूजन नगरसेविका मयुरी केरकर यांनी केले.

यावेळी प्रदीप वेंगुर्लेकर, गोपाल नार्वेकर, अमित नाईक, ईश्वर माने, डॉ. सचिन भांडे, दीपाली नाईक, राहुल मोर्डेकर, विशाल चेंदवणकर, अवधूत नाईक, सोहम पेडणेकर, किरण मेस्त्री, उज्ज्वल गडेकर, जयेश गावडे, पार्थ वेंगुर्लेकर, राजन प्रजापती, निहार नवार, साईराज मातोंडकर आदी उपस्थित होते.