मिरकरवाडा परिसरातील पडिक झोपडीला आग; जिवितहानी नाही

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील मिरकरवाडा परिसरात असलेल्या एका पडिक झोपडीला गुरुवारी मध्यरात्री अचानकपणे आग लागली. सुदैवाने या आगित कोणतीही जिवितहानी झालेली नसून नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
गुरुवारी मध्यरात्री 12. ते 12.30 वा.सुमारास मिरकरवाडा येथील एका पडीक झोपडीला अचानकपणे आग लागली. काही वेळातच आगीन रौद्ररुप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे उंच लोट दिसून आल्याने तेथील नागरिकांनी तातडीने नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळातच नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनच्या जवानांनी अथक परिश्रम करुन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.