रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील वाटद खंडाळा येथे बेशूध्द अवस्थेत सापडून आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 2 एप्रिल रोजी सकाळी 11.15 वा.सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे घडली.
सुनिल शांताराम बैकर (44,रा.पन्हळी,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी सुनिल बैकर हा दारुच्या नशेत पन्हळी चिरेखाण येथे झाडा-झुडपाच्या आडोशाला बसलेला दिसून आला होता.त्यानंतर त्याठिकाणी तो बेशूध्द अवस्थेत मिळून आल्याने तेथील नागरिकांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सुनिलला तपासून मृत घोषित केले.












