शीर्षक,: बूथ अध्यक्ष यांची जबाबदारी मोठी…..

माजी आमदार अजित गोगटे

विजयदुर्गमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय महाअभियनाचा शुभारंभ

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपाच्या बूथ अध्यक्षांची जबाबदारी मोठी असून तळागाळातून संघटना वाढीसाठी मिळणारे त्यांचे योगदान सत्तेच्या चाव्या आणि त्यातून होणारा विकास साधत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अजित गोगटे यांनी विजयदुर्ग येथे केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ हा कार्यक्रम भाजप पडेल मंडलाच्या वतीने विजयदुर्ग येथील एमटीडीसी पर्यटन निवासामध्ये संपन्न झाला. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी अजित गोगटे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भाजप पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, महिला अध्यक्षा संजना आळवे, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ नारकर, जि. प. सदस्य संजय बोंबडी,अमोल तेली, सौ. अवनी तेली, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, भाजपचे जि. प. सदस्य, पं.स.सदस्य, बूथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुख तसेच पडेल कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रकाश गोगटे यांनीही मार्गदर्शन करताना भाजपाच्या एकूण कार्यशैली संदर्भात उहापोह केला. दरम्यान,, दिवसभर चाललेल्या या महाभियानामध्ये विविध कांगोरेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.