जिल्हा बँकेचे विकास अधिकारी संजय परब यांना पितृशोक
कुडाळ : कालेली येथील ज्येष्ठ, शांत, प्रेमळ व गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व साबा शंकर परब (वय ९५) यांचे बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
साबा परब हे मनमिळाऊ स्वभावाचे व सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने कालेली गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, तीन पुतणे, सुना, नातसुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विकास अधिकारी संजय परब यांचे ते वडील होत.












