शिवार आंबेरे, पेजेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त शालेय चित्रंगभरण व वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे शिवार आंबेरे, पेजेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव अतिशय आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने विविध कार्यक्रमांनी उत्सव संपन्न होतो. प्रसंगी वाडीतील सुस्वर भजन, भोवत्या, क्रिकेट स्पर्धा, नाटक इ . उपक्रम हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरतात.

यावर्षीचे विशेष आयोजन म्हणजे मारुतीरायाच्या सेवेप्रित्यर्थ आज दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वा. हनुमान मंदिर परिसर पेजेवाडी येथे तरुण विकास मंडळ पेजवाडी व अर्था सोनाली सुदेश नाटेकर यांच्या सौजन्याने शालेय चित्ररंगभरण व वक्तृत्व स्पर्धा अतिशय हर्षोल्हासात संपन्न झाली.

लहान मुलांच्या मनात शिक्षणाप्रती तसेच पर्यावरण तंत्रज्ञान याच्याबद्दल सकारात्मक भावना व त्या दृष्टिकोनातून त्यांच्या भविष्यातील जीवनात एक महत्त्वाचा वैचारिक पैलू घडवण्याच्या तसेच आजच्या या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आजच्या या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

तरी या स्पर्धेमध्ये आदर्श शाळा भडे क्र. १, जिल्हा परिषद शिवार आंबेरे शाळा क्र. १ व २, जिल्हा परिषद दाभिळ आंबेरे शाळा, जिल्हा परिषद गावडे आंबेरे शाळा क्र. १ व २ या शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवून मोलाचे सहकार्य केले.

या स्पर्धेमध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेसाठी निवृत्त शिक्षक श्री दयानंद लाखण गुरुजी, श्री गोपाळ रोकडे गुरुजी आणि श्री. दिवाकर तरळ सर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले.

🔸 चित्ररंगभरण स्पर्धा (लहान गट) – प्रथम आयुषा दिलीप पेजे, द्वितीय अद्विता अनिल पोतदार, तृतीय श्रद्धा जितेंद्र सुतार.

🔸 चित्ररंगभरण स्पर्धा (मोठा गट) – प्रथम साई संदीप शेलार, द्वितीय स्वरा निकेत बिर्जे, तृतीय वेदिका विकास लाखण.

🔸 वक्तृत्व स्पर्धा – प्रथम अन्वी सुरेंद्र लिंगायत, द्वितीय सिया प्रमोद माईन, तृतीय हर्षा राजेश गिजबिले.

स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर तरुण विकास मंडळ पेजेवाडी, शिवार आंबेरे मुंबई अध्यक्ष श्री. अनंत बाळू पेजे, सचिव श्री. सूर्यकांत नारायण पेजे, खजिनदार श्री. भरत कृष्णा पेजे त्याचप्रमाणे ग्रामीण अध्यक्ष श्री. सुभाष तानू पेजे, ग्रामीण सचिव श्री. अनंत यशवंत पेजे, ग्रामीण खजिनदार श्री. सुरज नारायण पेजे, महिला अध्यक्ष सौ. सपना सुधाकर पेजे, शाळा व्यवस्थापन समिती शिवार आंबेरे अध्यक्षा सौ. दुर्वा दिनेश पेजे उपस्थित होत्या.

त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती म्हणून शिवार आंबेरे गावचे माजी सरपंच व गावातील राजकीय तसेच सामाजिक नेतृत्व श्री जितेंद्रजी शिर्सेकर, पूर्णगड सागरी पोलिस अधिकारी – श्री. त्र्यंबक मौळे, होमगार्ड श्री. भितळे, श्री. सारंग, श्री. नानरकर उपस्थित होते.

व्यासपीठावरून श्री जितेंद्रजी शिर्सेकर‌ व त्र्यंबक सोमा मौळे (पूर्णगड सागरी पोलिस अधिकारी) यांनी मंडळाच्या कार्याची व उपक्रमाची स्तुती केली आणि विद्यार्थ्यांना व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी व्यासपीठाचे अध्यक्ष श्री अनंत बाळू पेजे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

विशेष सहकार्य – श्री सूर्यकांत पेजे, कौस्तुभ धनावडे, नंदकिशोर पेजे, अक्षय पेजे, भरत पेजे, दिलीप पेजे, समीर पेजे, वाडीतील सर्व सदस्य, महिला मंडळ पेजेवाडी.