भाजपतर्फे १० रोजी ‘संसद कोकण समृद्धी महोत्सवा’चे आयोजन
सावंतवाडी:भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पार पडणार आहे.
या स्पर्धेमध्ये १३ वर्षाखालील मुले व मुली, १७ वर्षाखालील मुले, खुला गट (मुले/मुली) आणि दुहेरी खुला गट अशा चार श्रेणींमध्ये सामने खेळवले जातील. विजेत्या खेळाडूंना ३ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी भाजपा शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक प्रतीक बांदेकर तसेच खेळाडू संकेत राऊळ, शुभम मुळीक व अक्षय पंडित उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी पंकज तुळसुळकर (९१३०६८३४७२) किंवा भाजपा कार्यालय (७८७५५२५४९६) या क्रमांकावर संपर्क साधून आपली नावनोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.












