उभ्या दुचाकीला भरधाव कारने ठोकरल्याने युवक जखमी 

बांदा सटमटवाडी येथील घटना 

बांदा l प्रतिनिधी :      मुंबई – गोवा महामार्गावर सटमटवाडी तपासणी नाक्यानजीक भरधाव कारने उभ्या दुचाकीवर बसलेल्या युवकाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. आदेश शेखर पेडणेकर (वय २८, रा. बांदा) असे जखमी युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून त्यावर बसलेला होता. त्यावेळी सुसाट वेगात येत असलेल्या कार चालकाचा ताबा सुटला व कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.

 

अपघातानंतर स्थानिकांनी त्याला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी गोव्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.