देवगडमध्ये २०० मच्छीमार बांधवांनी घेतला मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मच्छीमार सेवा शिबिराचे आयोजन

देवगड : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड येथे विशेष मच्छीमार सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये देवगड तालुक्यातील सुमारे २०० मच्छीमार पुरुष व महिलांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना तसेच अपघाती विमा योजनेचा लाभ घेतला. या उपक्रमाला मच्छीमार बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या महत्त्वपूर्ण शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते करण्यात आले. मच्छीमार समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली.

या प्रसंगी भाजप देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, देवगड मंडळ सरचिटणीस योगेश चांदोसकर, भाजप जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, महिला तालुकाध्यक्षा उषःकला केळुस्कर, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका प्रणाली माने, पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेविका तन्वी चांदोसकर, ऋचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, नगरसेवक संतोष तारी, गटनेते शरद टुकरूळ, रोहन खेडेकर, स्वच्छता सभापती बुवा तारी, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, माजी नगरसेवक व्ही. सी. खडपकर, ज्ञानेश्वर खवळे, सुभाष धुरी, बापू जुवाटकर, अक्षता घाडी, पंकज दुखंडे आणि उल्हास मणचेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरासाठी मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले