आर.बी.बॉईज, सावर्डेने पटकावले लांजा येथील मिनी शूटींग व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद

जाणता राजा ग्रुप लांजाचे वतीने स्पर्धेचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी): जाणता ग्रुप लांजा च्या वतीने आयोजित आणि आमदार किरण सामंत पुरस्कृत भव्य मिनी शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आर.बी बॉईज या संघाने पटकावले. रोख रुपये १५,५५५ आणि आकर्षक चषक देऊन या संघाला गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा सौ.सावली कुरुप‌ यांच्या हस्ते आणि उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर , शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, गटनेते योगेश कावतकर, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, सांगली जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी प्रमोद कदम, लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित कु़ंभार , जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक महेश (मुन्ना) खामकर,
व्यापारी संघटना अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, ज्येष्ठ खेळाडू सुधाकर पत्की, जाणता राजा ग्रुप लांजाचे मंगेश लांजेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील एकूण २९ संघांनी स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या उत्कृष्ट खेळाने तमाम क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. स्पर्धेत द्वितीय क्रमांक विजेता -महालक्ष्मी चिपळूण संघाला रुपये ११,१११ व आकर्षक चषक., तृतीय क्रमांक विजेता -एस.एम.चिपळूण संघाला रोख रुपये ७७७७ व आकर्षक चषक तर चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या
दत्तप्रासादिक घुढेवठार संघाला रोख रुपये ३३३३ आणि आकर्षक चषक अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट नेटमन-अजय वास्तर, महालक्ष्मी चिपळूण,रोख रुपये ५००- व आकर्षक चषक, उत्कृष्ट शूटर व डीगर -रुजान बोंबल,आर बी बॉईज, सावर्डे .
रोख रुपये ५००/- +५००/- व दोन आकर्षक चषक अशी वैयक्तिक स्वरूपाच बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेला ज्येष्ठ खेळाडू विद्याधर कामत, सुधाकर पत्की, डॉ. बारसकर , विनोद सावंत , सामाजिक कार्यकर्ते दिपक उर्फ भाई कामत, संजय तेंडूलकर, जाणता राजा ग्रुप लांजाचे सर्व शिलेदार,विनय बुटाला, राजू धावणे, अभिजित राजेशिर्के व‌,तमाम क्रिडाप्रेमी उपस्थिती होते.
स्पर्धा उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मकरंद पंत लिंगायत गुरुजी यांनी केले तर संदीप मयेकर यांच्या साथीने संपूर्ण स्पर्धेचे समालोचनही केले. आभार पांडरंग शिंदे यांनी मानले .स्पर्धा यशस्वीतेसाठी जाणता राजा ग्रुप लांजाचे संजय चव्हाण, मंगेश लांजेकर, संदीप कुंभार , किशोर कांबळे, भीमराव कांबळे,राज शेट्ये,राजा लांजेकर,समीर शेट्ये, गणेश शेट्ये,प्रकाश पांचाळ, सौरभ चव्हाण, सुभाष जाधव, दिलीप जाधव, किरण कांबळे,आजीनाथ पाटील , डॉक्टर धालवलकर, विनोद सावंत , संतोष हांदे,दिपक कामत आदींनी विशेष परिश्रम घेतले.