सेवांगण कट्टा येथे डिजिटल बोर्डचे उद्घाटन!

रोटरी क्लब मुंबई-माहिमची देणगी

मसुरे | झुंजार पेडणेकर  : बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे रोटरी क्लब मुंबई माहिम यांनी देणगी दिलेल्या डिजिटल बोर्डचे उद्घाटन संपन्न झाले.प्रारंभी दीपक भोगटे यांनी गेल्या सहा सात वर्षे रोटरी क्लब मुंबई माहिमने अडीच लाख रुपये किमतीची पुस्तके, सॅनिटरी मेकिंग मशिन, पूरग्रस्तांना जीवनावश्यक मदत, गरीब महिलाना भाजीपाला पिकवण्यासाठी पंप, आर्थिक मदत अशा प्रकारे अनेक उपक्रमांना सहाय्य केले आहे. आज १ लाख ३० हजार रुपये किमतीचा डिजिटल बोर्ड शिष्यवृत्ती वर्ग व इतर शैक्षणिक वर्गांसाठी देणगी दिला आहे. त्याबद्दल रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, विशेषतः रश्मी पाटील यांचे आभार मानले व परिसरातील इतर प्राथमिक शाळांना या बोर्डचा उपयोग वापर करण्यासाठी देण्यात येईल असे सांगितले.

रोटरियन रश्मी पाटील यांनी सेवांगणाच्या शिष्यवृत्ती वर्गाचा उपक्रम व इतर शैक्षणिक उपक्रम पाहून हा बोर्ड मंजूर केला. यात माझे श्रेय नसून सर्व पदाधिकारी प्रामुख्याने प्रे. शैला रेगे, सेक्रेटरी सुनिता पडवळ, व ट्रेझरर वंदना राजहंस यांचे आहे. मी फक्त समन्वयाचे काम केले. सर्व विद्यार्थ्यांनी या बोर्डचा वापर करून आपली शैक्षणिक उन्नती साधावी. शिवणवर्ग व इतर उपक्रमांसाठी सुद्धा या बोर्डचा वापर करावा अशी सूचना त्यांनी केली.
वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. राऊळ मॅडम, इंग्रजी विषयाच्या मार्गदर्शिका सायली चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
किशोर शिरोडकर यानी सेवांगणच्या उपक्रमाची माहिती दिली. व रोटरी क्लबला अपेक्षीत काम सेवांगण निश्चित पणे करेल असे आश्वासन दिले. बाळकृष्ण नांदोसकर यानी सूत्रसंचलन केले.
मनोज काळसेकर सर,विद्या चिंदरकर,
बाळकृष्ण गोंधळी यानी कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन केले.
या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू
तळावडेकर, रश्मी पाटील, देवयानी गावडे,
सायली चव्हाण, नांदोसकर गुरुजी, विद्या चिंदरकर, मनोज काळसेकर,
साक्षी अमरे, मंगल पराडकर, बाळकृष्ण गोंधळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.