पाण्यात उतरून आंदोलन करणा-या महिलांपैकी दोघांची प्रकृती खालावली
आचरा–अर्जुन बापर्डेकर
अवैध वाळू उपशा विरोधात तळाशिल वासियांनी सुरु केलेल्या आंदोलनात शासनाकडून कारवाई बाबत तळाशिल महिलांनी दोन दिवसाची मुदत देवूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त तळाशिल महिलांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाच पासून पाण्यात उतरत आंदोलन सुरु केले होते. यात दोन महिलांची प्रकृती खालावल्याचे समजते. यापैकी सौ चंद्रलेखा चंद्रकांत सादये वय 56 या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीच्यावर आरोग्य केंद्रात तातडीचे उपचार करून अधिक उपचारासाठी मालवण येथे हलविण्यात आले होते. खबर मिळताच शिवसेना आचरा विभागीय अध्यक्ष संतोष कोदे,आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षा सांबारी,विजय कदम,अभय भोसले, मांगिरीष सांबारी, हर्षद धुरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.











