कुवारबाव येथे भीषण अपघात
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरानजीक मिऱ्या नागपूर महामार्गावर कुवारबाव येथे बस स्टॉप वर थांबलेल्या शिवशाही बसला वेगाने आलेल्या दुचाकीची जोरदार धडक बसली आणि भीषण अपघात झाला. यात दुचाकी स्वार आणि सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हा अपघात मंगळवारी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला. रत्नागिरीच्या दिशेने जाणारी शिवशाही बस (MH 09 EM 9188) कुवारबाव येथे स्टॉपवर थांबली होती. प्रवासी बसमधून उतरत असतानाच हातखांब्याहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी दुचाकी (MH 08 BB 2841) वेगाने येत होती. त्यावरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी चालकासह थेट बसखाली गेली आणि अपघात झाला. यात चालकासह सहप्रवासी सुद्धा जखमी झाला
रोहित राजू सावंत व साईराज संतोष धोत्रे दोघेही (वय 23) अशी दोघांची नावे आहेत. दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









