आचिर्णे हादरले : गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू

आचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबार.!

एकाचा मृत्यू, दुसरा जखमी.!

शिकारीदरम्यान घटना घडल्याची प्राथमिक माहिती.!

वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक जण ठार झाला असून दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागून तो जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आचिर्णे परिसरात काही जण मध्यरात्री शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक गोळीबार झाला. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागली. जखमीला तातडीने कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. गोळीबार नेमका अपघाती झाला की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.