दोडामार्गचे आराध्य दैवत श्री देव पिंपळेश्वर देवस्थानचा उद्या १९ वा वर्धापन दिन

धार्मिक विधींसह ‘ओ काका.. आनी.. आनी नाका’ कोकणी नाटकाची मेजवानी; भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

​दोडामार्ग | प्रतिनिधी:
संपूर्ण दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या बाजारपेठ येथील श्री देव पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन उद्या, गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने देवस्थान समितीच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.
​वर्धापन दिनाचे औचित्य साधून सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा पार पडणार आहे. त्यानंतर १० वाजता आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
​सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. यामध्ये सावंतवाडा-दोडामार्ग येथील श्री दत्त राष्ट्रोळी भजन मंडळ यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. तर रात्री १० वाजता मनोरंजनाचा विशेष धमाका रंगणार आहे. गोव्यातील गाजलेले कोकणी नाटक “ओ काका .. आनी.. आनी नाका” याचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
​तरी या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी दोडामार्ग शहर व परिसरातील भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव पिंपळेश्वर देवस्थान समिती, बाजारपेठ दोडामार्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.