भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी | प्रतिनिधी : 2017 पासून डाक विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली जाते. या उपक्रमात पत्रलेखनेच्या कलेलाच केवळ चालना दिली जात नाही तर राष्ट्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहभागींमध्ये सृजनशीलता आणि सहानुभूती वाढवण्याचा प्रयत्न असतो. सन 2023 -24 या वर्षांमधील ‘धाई आखर’ राष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा दिनांक 1 ऑगस्ट 2023 ते 31ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये ‘डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया’ या थीमवर आयोजित करण्यात येत आहे.

स्पर्धेचे अटी, नियम आणि विषय पुढीलप्रमाणे आहेत. ‘डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया’ या विषयावर स्पर्धकांना पत्र लिहायचं असून कोणत्याही भारतीय नागरिक यामध्ये भाग घेऊ शकतो. मराठी, इंग्रजी किंवा हिंदी भाषेमध्ये तो पत्र लेखन करू शकतो. या स्पर्धेसाठी फक्त अंतरदेशीयपत्र, पोस्टाचा लखोटा, साधा लखोटा, (आवश्यक तिकीट लावून) याचा वापर करायचा आहे. आंतरदेशीयपत्र किंवा ए 4 साईज कागदावरच पत्र हाती लिहायचा आहे. शब्दांचे मर्यादा आंतरदेशीय पत्र 500 शब्द आणि ए 4 साइझ कागदावर 1000 शब्द. गट 1- वय 18 वर्षापर्यंत, गट 2- वय 18 वर्षावरील.

तसंच “I certify that I am below/above the age of 18 as on 01.01. 2023”, “मी असा दाखला देतो देते की 01.01. 2023 रोजी 18 वर्षावरील /अठरा वर्षाखालील गटात समाविष्ट होते/ होतो” असा दाखला सदरहू पत्रासोबत लिहिणं आवश्यक आहे.

पत्र पाठवण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 असून पत्र जवळच्या पत्रपेटीमध्ये टाकायची आहेत. पत्र पाठवण्याचा पत्ता – मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल ऑफिस, मुंबई 400001.

पहिल्या तीन क्रमांकाला सर्कल स्तरावर पुढील बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक- रुपये 25000, द्वितीय क्रमांक – रुपये 10000, तृतीय क्रमांक- रुपये 5000. सर्कल स्तरावरील तीन बक्षीस पात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठवली जाणार आहेत. त्यानंतर तेथे पुन्हा तीन नंबर काढण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं असा आवाहन नं. तू. कुरळपकर, डाक अधीक्षक रत्नागिरी यांनी केला आहे.