देवगडमध्ये नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवगड : कोकणचे भाग्यविधाते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड येथे विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री देव ब्राम्हणदेव मंदिर येथे राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता नगरसेवक बुवा तारी आणि नगरसेविका सौ. प्रणाली माने यांच्या पुरस्कृत देवगड शहरातील रिक्षा व टेम्पो व्यावसायिकांसाठी मोफत १ लिटर पेट्रोल व १ लिटर डिझेल वितरण कार्यक्रम होणार आहे.

 

तसेच दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता “खेळ पैठणीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यामध्ये १५ हजार रुपयांची पैठणी, सोन्याची नथ आणि सहभागी महिलांसाठी आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय मोफत लकी ड्रॉद्वारेही विजेत्यांना बक्षिसे मिळणार आहेत.

 

दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता निमंत्रित दिंडी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, प्रथम पारितोषिक १० हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, तर तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक असे ठेवण्यात आले आहे.

 

तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी “खेळ पैठणीचा” कार्यक्रमास उपस्थित रहावे तसेच भजनप्रेमींनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.