खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शिवसेनेचा उपक्रम ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : लोकनेते माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शाखा मालवण यांच्या वतीने मच्छिमार महिलांना मत्स्य व्यवसायास उपयोगी टब, छत्री वाटप मालवण शिवसेना शाखा येथे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
राणे साहेबांना दीर्घायुष्य लाभो. राणे साहेब, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकास होत राहो. अश्या सदिच्छा दत्ता सामंत यांनी व्यक्त केल्या.
यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, युवा उद्योजक सोनू खांदारे, जिल्हापरिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, समाज
कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, शहर संघटक राजू बिडये, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, उपतालुका विजय चव्हाण, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, वसंत गांवकर, नगरसेविका मेघा सावंत, निना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, मोहन वराडकर, सूर्यकांत फणसेकर, शिवाजी केळूसकर, नरेश हुले, भाई मांजरेकर, प्रशांत परब, अखिलेश शिंदे, विहार कोदे यांसह शिवसेना पदाधिकारी तसेच मच्छिमार महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
*वर्षभर विविध उपक्रम*
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब 75 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होणार आहे. वर्षभर दर महिन्याच्या 10 तारिखला विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक नगरसेवक महेश कांदळकर यांनीही शुभेच्छा देताना सांगितले, प्रशासनावर वचक आणि दरारा असलेले नेतृत्व खासदार नारायण राणे साहेब आहेत. त्याच प्रमाणे आमदार निलेश राणे यांचे नेतृत्व आहे. असे महेश कांदळगांवकर यांनी सांगितले.












