खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित केरवाडा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

विजय क्रिकेट क्लब केरवाडा व केरवाडा ग्रामस्थ यांचे आयोजन

विजयी संघाचा ५१ हजार व आकर्षक चषक देऊन होणार गौरव..

वेंगुर्ले : दाजी नाईक
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार मा. नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित विजय क्रिकेट क्लब केरवाडा व केरवाडा ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ स्पर्धेचा शुभारंभ आज शुक्रवारी भाजप वेंगुर्ला तालुका सरचिटणीस तथा मच्छीमार सेल पदाधिकारी वसंत तांडेल व शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतून विजय होणाऱ्या संघाला ५१ हजार आणि उपविजेत्या संघाला २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रेडी- केरवाडी पं स. सदस्या सौ. प्रियांका घाटवळ, रेडी ग्रा पं सरपंच श्री. रामसिंग राणे, शिरोडा माजी सरपंच श्री मनोज उगवेकर , माजी उपसरपंच श्री रवी पेडणेकर , शिरोडा ग्रा. पं सदस्य श्री. सुधीर नार्वेकर , सौ. अनन्या घाटवळ श्री प्रथमेश बांदेकर , पोलिस पाटील श्री प्रजय पडवळ , सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र परब भाजप चे पदाधिकारी श्री बाळू वस्त, श्री सोमकांत सावंत , श्री गोपाल बटा , श्री स्वप्नील तोरसकर ,श्री शंकर घाटवळ ,श्री नाना नाईक , श्री दाजी धुरत, श्री राजन घाटवळ , श्री दिलीप नाईक, श्री नरेंद्रनाथ उगवेकर , श्री उमेश पडवळ त्याचप्रमाणे माऊली देवस्थान केरवाडी मान्यवर श्री शामसुंदर नाईक , श्री दाजी साळगावकर , श्री रामचंद्र बटा तसेच श्री सुनील साळगावकर , श्री संजय उगवेकर , श्री आपा साळगावकर , श्री आबु तुळसकर ,श्री रामचंद्र पडवळ , श्री विजय पडवळ , श्री विनोद भगत आदी मान्यवर , भाजप कार्यकर्ते तसेच विजय क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.