सावंतवाडी : चौकुळ पानयेलकरवाडी येथील आणि सध्या सांगेली देवकरवाडी येथील रहिवासी सौ. शोभा वामन गावडे (८३) यांचे मंगळवार ७ एप्रिल रोजी डोंबिवली येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे निवृत्त कर्मचारी वामन गावडे यांच्या त्या पत्नी, मुंबईस्थित संजय गावडे, यशवंत उर्फ आबा गावडे, भास्कर गावडे यांच्या त्या मातोश्री तर सह्याद्री कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे निवृत्त जनरल मॅनेजर भरत शिरोडकर यांच्या त्या बहीण होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, दोन भाऊ, बहिण, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.










