ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावाने दशावतार कलेला अनेक रत्न दिली त्याच बरोबर दशावतार कलाकार आणि दशावतार कला यावर नेहमीच उदंड प्रेम केले आणि याची उदाहरण म्हणजे दहिकाल्याची म्हणजे जत्रौ त्सवातील नाटके संपल्यानंतर दशावतार मोसम सुरु झाल्यापासून पाऊस सुरु होईपर्यंत गावात होणारे दशावतार नाट्य प्रयोग पावसाळ्यात सुद्धा संयुक्त नाटक आयोजित केली जातात. यावर्षी तर दशावतार प्रयोगाचा अक्षरशः पाऊस पडला आतापर्यत कित्तेक कंपन्यांचे नाट्य प्रयोग या वर्षी सादर झालेत.रविवार 12 एप्रिल रोजी सती देवी मंदिरातील नारायण यसो वर्णेकर रंगमंचावर भिवा म्हापसेकर आणि मांडवफातर वाडी ग्रामस्थ यांच्या सौजन्याने देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा “गरुड मारुती युद्ध” हा दशावतार नाट्य प्रयोग ठीक 7.30 वाजता होणार आहे.तर सोमवार 13 मे रोजी ओटवणे गावचे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांच्या संकल्पनेतून करमळगाळू ग्रामस्थ यांच्या सहकार्यातुन प्रथमच ओटवणे लिंगदेवस्थान करमळ गाळू येथे ठीक रात्रौ ठीक 8 वाजता कै.सुधीर कलिंगण प्रस्तुत महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग “गोमय गणेश” हा होणार आहे. या प्रयोगा पूर्वी मान्यवरांचा सत्कार सोहळाही पार पडणार आहे.
बुधवार 15 एप्रिल रोजी ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांच्या वाढदिवसा निमित्त खास कुळघर ओटवणे येथे श्रीं देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी, कुडाळ यांचा “भक्तांची पाठीराखी आदिमाया” हा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे या नाट्य प्रयोगाचा लाभ नाट्य रसिकांनी घेण्याचे आवाहन ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांनी केले आहे.











