देवगड येथे नाट्यमहोत्सवाचे आयोजन

देवगड / प्रतिनिधी :राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे पुरस्कृत व युथ फोरम-देवगड आयोजित २४ ते २६ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ७ वाजता येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे ‘नाट्य महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य महोत्सवाचे हे द्वितीय वर्ष असून या महोत्सवात रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत एकूण सहा नाट्य कलाविष्कारांचे सादरीकरण होणार असून २ बालनाट्य, २ एकांकिका, १ दिर्घाक आणि एका दोन अंकी नाटकाचे सादरीकरण नाट्य महोत्सवात होणार आहे, अशी माहिती युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली.

संस्थाध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या युथ फोरम संस्थेच्या बैठकीत ‘नाट्य महोत्सव- २०२६’ चे नियोजन करण्यात आले. यावेळी युथ फोरमचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, खजिनदार सागर गांवकर, सहसचिव ऋत्विक धुरी, रसिका सारंग, कार्यकारणी सदस्य आकाश सकपाळ, युथ फोरम देवगड- जामसंडे शहर अध्यक्ष ओंकार सारंग, शहर उपाध्यक्ष संयम सोमण, सचिव आज्ञा कोयंडे, गोविंद माळी, दीपक जानकर आदी उपस्थित होते. नाट्य महोत्सवाची रुपरेषा स्पष्ट करताना अॅड. सिद्धेश माणगांवकर म्हणाले, या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. उद्घाटनंतर ७ वाजता बालनाट्य देवराई (नेरुर कुडाळ), रात्री ८ वाजता दीर्घाक युगानुयुगे तूच (मुंबई) चे सादरीकरण होणार आहे. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. एकांकिका थडगं (रत्नागिरी), रात्री ८ वाजता बालनाट्य – लगोरी (देवगड), ९ वाजता एकांकिका डंपिंग टुगेदर (देवगड) चे सादरीकरण होणार आहे. २६ एपि -ल रोजी सायंकाळी ७.३० वाजता संदुक (देवगड) या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. ‘संदूक’ या नाट्य कलाकृतीने नुकत्याच पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले असून या नाटकात देवगडमधील कलाकारांचा सहभाग आहे. हा नाट्य महोत्सवासाठी संस्थेमार्फत नाट्य महोत्सव समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी आज्ञा कोयंडे यांची, उपाध्यक्षपदी आकाश सकपाळ यांची, तर सदस्यपदी गोविंदकुमार माळी, दीपक जानकर, प्रतिक चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. समिती प्रभारी म्हणून ऋत्विक धुरी काम पाहणार आहेत. हा नाट्य महोत्सव विनामूल्य असून रसिकानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड. माणगांवकर यांनी दिली.

*पालकमंत्री नीतेश राणे यांची घेतली भेट*

दरम्यान, नाट्य महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात युथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पालकमंत्री नीतेश राणे यांची कणकवली येथे सदीच्छा भेट घेतली. यावेळी नाट्य महोत्सव समितीच्या आज्ञा कोयंडे यांना अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे अध्यक्ष प -मोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगावकर, अमित पारकर, ओमकार सारंग, सलोनी कदम आदी उपस्थित होते.