रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची हॅन्डबॅग चोरून चोरटा धावत असताना…

रत्नागिरी ः प्रतिनिधी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची हॅन्डबॅग लांबवणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 24 जून रोजी सायंकाळी 5 वा.एर्नाकुलम-ओखा एक्सप्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशनपासून 15 मीटर अंतरावर घडली आहे. गुलाम अली (41) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,24 ज्ाून रोजी फिर्यादी पत्न्ाीसह एर्नाकुलम-ओखा एक्सप्रेसने प्रवास करत होते.ही रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे येउन पुढील प्रवासासाठी सुटल्यानंतर रेल्वेत फिरणार्‍या संशयिताने फिर्यादींच्या पत्नीचे लक्ष नसल्याचे पाहून सिटवर बाजुस ठेवलेली हॅन्डबॅग घेउन रेल्वेची गती कमी असल्याने बाहेर उडी मारली.फिर्यादीनेही त्याच्या मागून धाव घेत त्याचा पाठलाग करत असताना त्या संशयिताची बॅग पकडली.परंतू तो चोरटा पळ काढण्यात यशस्वी झाला.त्या संशयिताच्या बॅगमध्ये दातांच्या डॉक्टरची पावती सापडली असून त्यावर गुलाम अली असे नाव समजून येत आहे.याप्रकरणी त्याच्याविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.