३० मे पर्यंत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
सावंतवाडी (प्रतिनिधी):
भटवाडी-सावंतवाडी येथील ‘नॅब नेत्र रुग्णालयाने’ आपल्या यशस्वी सेवेच्या चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात गुरुवारी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रुग्णालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष आरोग्य सवलती जाहीर केल्या आहेत. ३० मे २०२६ पर्यंत रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांची डोळ्यांची तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. तसेच, ज्या गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी मोफत शस्त्रक्रिया करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, रुग्णांना अत्यंत माफक दरात दर्जेदार चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घेऊन आपले डोळे निरोगी ठेवावेत, हेच आमचे ध्येय आहे,” असे मत नॅब नेत्र रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.











