योजना किती चांगली आहे त्यापेक्षा राबवणारे किती चांगले आहेत हे महत्त्वाचे ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण

योजना किती चांगली आहे त्यापेक्षा राबवणारे किती चांगले आहेत हे महत्त्वाचे ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण

कुडाळ येथे संपन्न झाला महसूल दिनानिमित्त एक हात मदतीचा कार्यक्रम

कुडाळ प्रतिनिधी

शासनाच्या कोणत्याही योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जाणारे अधिकारी व कर्मचारी त्यांची मानसिकता काय आहे त्यावर सरकार बाबतची भावना जनतेत तयार होत असते असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या महसूल दिनाचे औचित्य साधून एक हात मदतीचा या कार्यक्रमात एक बोलत होते.

कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये महसूल विभागामार्फत एक हात मदतीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक अग्रवाल, जिल्हा परिषद मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच अधिकारी कर्मचारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांमधून अर्थसाह्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभाचे वाटप करण्यात आले यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेला भारत आता तयार होत आहे लोकांपर्यंत योजना जात आहेत अजूनही काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज असून यामध्ये आपण यशस्वी तिकडे जाऊ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत त्याला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे योजना कितीही चांगली असली तरी ती लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जाणारा अधिकारी व कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे असे त्यांनी सांगून पुरामध्ये ज्या लोकांना धाडसी तरुणांनी वाचवले आहे त्यांना रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल असे सांगितले.