ठाकरे गटाला मालवणात धक्का
भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक पंकज सादये यांचा भाजपात प्रवेश
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर नगरपरिषद दांडी प्रभागातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पंकज सादये यांनी अनेक सहकाऱ्यांसह गुरुवारी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
मालवण शहर भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, जगदीश गावकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, आबा हडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, देवली माजी सरपंच विजय चव्हाण, चिंदर सरपंच दीपक सुर्वे, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, शहर अध्यक्ष चारू आचरेकर, ममता वराडकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, दिव्या कोचरेकर, भाऊ मोरजे, प्रमोद करलकर, पंकज पेडणेकर, भाऊ मोरजे, युवमोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालेकर, निकित वराडकर, निनाद बादेकर, राज कांदळकर, अवि सामंत, भाई मांजरेकर, नारायण लुडबे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
निलेश राणे म्हणाले, पंकज सादये आपले भाजाप पक्षात स्वागत. आपण विकासाची जी संकल्पना सांगाल ती भाजपच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. आपल्या पाठीशी आम्ही पूर्ण राहू. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप मित्रपक्ष केंद्र व राज्य सरकार माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणला जात आहे तसाच यापुढे जाईल. दांडी येथे ही विकास कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल. रस्ता कम बंधारा लवकरात पूर्ण केला जाईल. मागील ९ वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू. जनता सांगेल त्यानुसार विकासाला प्राधान्य राहील. अन्य मोठ्या शहरांच्या धर्तीवर मालवण शहराचा विकास हेच लक्ष राहील. विकासासाठी भाजप पक्ष तुमच्या सर्वांच्या सोबत आहे.
आगामी नगरपालिका व सर्व निवडणुकीत भाजपचा १०० टक्के विजय हेच लक्ष तुमचे आमचे सर्वांचे राहणार आहे. जो येईल त्याला भाजपात सन्मानाने स्थान दिले जाईल. असे निलेश राणे यावेळी म्हणाले.
यावेळी शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी विचार मांडले. निलेश राणे गेल्या काही वर्षात सातत्याने मालवण कुडाळ तालुक्यात जनतेत राहून काम करत आहेत. येथील विकासाची गती पाहता आगामी काळात निलेश राणे मोठ्या मताधिक्याने आमदार होतील. विकासाचा बॅकलॉग भरून निघेल. असा विश्वास सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला. मालवण शहरात मोठया प्रमाणात निधी येत आहे. आगामी काळात जनता सांगेल तो विकास. मच्छिमार, पर्यटन, व्यापार उद्योग या माध्यमातून गतिमान विकास साध्य केला जाईल. अपूर्ण बधाऱ्यांचे काम निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल. असेही आचरेकर म्हणाले.
पंकज सादये यांसह अनेकांचा भाजप प्रवेश
माजी नगरसेवक पंकज सादये यांसह लुईस फर्नांडिस, सुशांत शेलटकर, राजेश परब, संतोष वायंगणकर, परेश वाघ, नरेश कोयंडे, मंगेश कोयंडे, ऍशन फर्नांडिस, जॉन फर्नांडिस, बबलू मोंडकर, विष्णू मालंडकर, राजन परब, दुमिंग फर्नांडिस, राजेश हुले, अंतोन काळसेकर, ज्ञानदेव केळूसकर, बॅनी काळसेकर, इशेद डिसोजा, बाबू खोबरेकर, विशाल नागवेकर, रॉनी फर्नांडिस, रोमन, कुशल नागवेकर, सुनील मालंडकर, कुणाल मालंडकर, दिनेश परब, मिलिंद मेस्त, मॉरीस फर्नांडिस, हरेश परब, उमेश हडीकर, दर्शन गावकर, सिद्धार्थ परब, आलू डिसोजा, समीर गावकर, विशाल आचरेकर, किरण कोयंडे, सचिन तारी, मोहन परब, कौस्तुभ प्रभू, निलेश मोंडकर यासह अन्य सहकारी यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.











