चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कापरे देऊळवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्यमंत्री श्रीसाई आशिष मोरे यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणे सादर केली. यामध्ये श्रावणी महेंद्र कदम, प्रियांशी गजमल, हर्ष कदम, सुर्वी शितप, तनुष्का भैरवकर, रुद्र मोरे, आदिती भुर्के, आराध्या भैरवकर, आकृती कदम, श्रेया मोहिते, हर्षल पवार, जयण गजमल, समृद्धी आंबेडे, पायल जाधव, सम्यक कदम, संस्कृती तामुंडकर, समृद्धी कदम,मधुरा भडवळकर, श्रेयश भोसले, श्रेयांशु लाखण, श्रीसाई मोरे आदी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण केले. मुख्याध्यापिका मानसी महाडीक आणि पदवीधर शिक्षक संतोष तांबे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या जन्म, शिक्षण आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपटही दाखवण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका मानसी महाडीक, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश गांधी, पदवीधर शिक्षक संतोष तांबे आणि उपशिक्षक गणेश सुर्वे यांनी उत्तम प्रकारे केले. तर समृद्धी आंबेडे आणि पायल जाधव यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली. अध्यक्षीय भाषणात श्रीसाई मोरे यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, प्रेरणा आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवणारा ठरला.












